धक्कादायक, शाळेच्या आवारात चौथीच्या विद्यार्थ्याची हत्या

शाळेच्या आवारातच  ४ थीच्या विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्यात  घडली आहे.  सुरज भोईर असे हत्या झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. मुरबाड तालुक्यातील नांदेणी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकारणारा सुरज हा आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास लघुशंकेसाठी वर्गा बाहेर पडला. मात्र तो परत आलाच नाही.

गळ्यावर आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार

शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्याचा शोध घेतला असता शाळेच्या आवारात असणाऱ्या एका पडक्या घरात तो मृतावस्थेत आढळला. सुरजच्या गळ्यावर आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले होते. मुरबाड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून तपास सुरु केला आहे.

विद्यार्थ्याची हत्या झाल्याने गावात  खळबळ

मात्र शाळेच्या आवारात विद्यार्थ्याची हत्या झाल्याने गावात  खळबळ उडाली आहे. शाळेला लागून असलेल्या घरात सुरजची हत्या होत असतांना कोणाच्या लक्षात ही बाब आली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *