चाकू दाखवून सोन्याची बिस्किटं लुटली!

मुंबईहून दीड कोटी रुपये किंमतीची सोन्याची बिस्किटं आणि ६० हजार रुपये रोख घेऊन आलेल्या पुण्यातील एका इसमाला चोरट्यांनी चाकूचं धाक दाखवून लुटलं आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालेवाडी स्टेडियमजवळ बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील समृद्धी ज्वेलर्सचा कर्मचारी बेहराम पुरोहित हा मुंबईतील झवेरी बाजारातून चार किलो ९०० ग्रॅमची सोन्याची बिस्किटं व रोकड घेऊन येत होता. खासगी विमानानं तो बालेवाडी इथं उतरला. तिथून पुण्याला जाण्यासाठी त्यानं रिक्षा पकडली आणि तो टिंबर्स मार्केटच्या दिशेनं प्रवास करत होता. याच दरम्यान, बालेवाडी येथे रिक्षातच चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून त्याचा मोबाइल, रोख रक्क्म आणि खिशातील सोन्याची बिस्किटं असा ऐवज घेऊन पोबारा केला.

या प्रकरणी पुरोहितनं लगेचच फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *