मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये मंगळसूत्र पळवले

अज्ञात लुटारूने मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये घुसून एका ६८ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील तब्बल ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लुटून पलायन केल्याची घटना नुकतीच पनवेल रेल्वे स्थानकात पहाटेच्या सुमारास घडली. मंगळसूत्र खेचताना झालेल्या झटापटीत वृद्धेच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या प्रकरणी पनवेल रेल्वे पोलिसांनी अज्ञात लुटारूविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *