फेरीवाल्यांची मुजोरी, कपडे परत करणाऱ्या महिला-पतीला मारहाण

रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसणाऱ्या फेरीवाल्यांची मुजोरी आणि गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढलीय.  नागपुरातही एक असाच प्रकार समोर आलाय. विकत घेतलेले कपडे परत करायला गेलेली महिला आणि पतीला एका फेरीवाल्यानं केलेली जबर मारहाण सीसीटीव्हीत कैद झालीय.

कपडे परत घेण्यास नकार

पूजा व तिचा पती अंकेष सोनकुसळे यांनी सीताबर्डीतील मेन रोड वरील फेरीवाल्याकडून कपडे विकत घेतले. दुसऱ्या दिवशी कपडे होत नसल्यानं सोनकुसळे दाम्पत्य ते परत करण्यासाठी फेरीवाल्याकडे पोहोचले. फेरीवाल्यानं कपडे परत घेण्यास नकार दिला. त्यातूनच वाद झाला. आणि फेरीवाल्यानं पूजाला शिवीगाळ केली. त्यानंतर तिच्या पतीवर धवून गेला. आणि मारहाण केली.

मारहाण सीसीटीव्हीत कैद

पूजानं फेरीवाल्याला अडवण्याचा प्रयत्न केला. फेरीवाल्यांनं मारहाण केली. इतकंच नाही, त्याच्या साथीला इतर फेरीवालेही सामील झाले. मारहाण करताना आपण सीसीटीव्हीत कैद होऊ नये म्हणून त्यांनी तोंडं झाकली. याप्रकरणी पोलिसांनी एका फेरीवाल्याला ताब्यात घेतलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *