अलिबागचा बंगला जप्त होणार

नीरव मोदी यांचा अलिबाग तालुक्यातील किहीम येथे आलिशान बंगला असून तो लवकरच सील केला जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

अलिबाग तालुक्यातील किहीम परिसरात अनेक सेलिब्रेटींचे आलिशान बंगले आहेत. काहींनी सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. या उभारलेल्या अनधिकृत इमल्यांमध्ये मोदींचा बंगला किहीम किनाऱ्यालगत उभा आहे. सीआरझेडचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने त्यांना नोटीसदेखील बजावल्या आहेत. किहीम ग्रामपंचायत हद्दीत हा बंगला असल्याने या बंगल्याला ग्रामपंचायतीची घरपट्टी आहे. नीरव दीपक मोदी या नावाने या बंगल्याची ग्रामपंचायतीत नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *