फेकन्युज : नानांच्या नावाखाली..

‘‘पाल रात्रभर किडे, कीटक खाऊन सकाळ झाली की गांधीजींच्या छायाचित्राच्या मागे जाऊन लपते. हेच काम गेली कित्येक वर्षे काँग्रेस करीत आली आहे.’’ सडेतोड मत व्यक्त करण्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या अभिनेते नाना पाटेकर यांच्या वक्तव्याने काँग्रेसजन संतापले आहेत. समाजमाध्यमांवर काँग्रेसला लक्ष्य करणारे हे विधान ‘योगी आदित्यनाथ की सेना’ या फेसबुक पेजवर आहे आणि ते पाच हजार वेळा ‘शेअर’ करण्यात आले आहे. याच वेळी या विधानाशी तुम्ही सहमत आहात का, असाही सवाल करण्यात आला आहे.

परंतु नाना पाटेकर यांनी हे विधान धादांत खोटे असल्याचे म्हटले आहे. ‘मी असे कोणतेही विधान केलेले नाही वा तसा माझा दृष्टिकोन नाही,’ असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *