वाहनचालकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

गाडी चालवता चालवता वाहनचालकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर घडलीय. तानाजी खाडे हे मुंबईतल्या चुनाभट्टी इथून पुण्याकडे निघाले होते. त्यावेळी घाटात जात असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे खाडे यांनी आपली डस्टर गाडी रस्त्याच्या बाजूला लावली.

मात्र घाटाच्या चढणावरुन गाडी खाली येऊ नये म्हणून त्या परिस्थितीतही खाडे यांनी प्रसंगावधान दाखवत हँडब्रेक लावले आणि क्षणार्धात प्राण सोडला. मालक आणि इतर वाहनांना धोका निर्माण होऊ नये म्हणून खाडे यांनी मृत्यूक्षणी प्रसंगावधान दाखवल्यानं मोठा अनर्थ टळलाय.

आपल्या तानाजी या नावाला सार्थ ठरवत अखेरच्या क्षणापर्यंत मृत्यूशी झुंज देत त्यांनी इतरांचे प्राण वाचवले आणि मग आपला जीव सोडला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *