नोकरी नाकारण्याचं असंही कारण असू शकतं?

एखाद्या उमेदवाराला नोकरी नाकारण्याची तशी कारणं अनेक आहे. म्हणजे अनुभव कमी असणं, शैक्षणिक पात्रता न जुळणं, उमेदवारामध्ये तेवढी पात्रता नसणं वगैरे वगैरे. पण रशियामध्ये एका तरूणाला तो गे सारखा दिसतो म्हणून चक्क नोकरी नाकारण्यात आली. नोकरी नाकारण्याचं कारण जेव्हा त्याला समजलं तेव्हा त्यानं कंपनीविरोधात न्यायालयात धाव घेतली.

रशियातल्या मार्या नावाच्या तरूणानं एलसीसी हॉर्डकोरमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. पण त्याला नोकरी नाकारण्यात आली जेव्हा नोकरी नाकारण्याचं कारण त्यानं कंपनीला विचारलं तेव्हा तो गे सारखा दिसतो असं कारण त्याला देण्यात आलं. एका सामान्य मुलापेक्षा त्यानं स्वत:ला जरा जास्तच नीटनीटकं समोर आणलं होतं. एखादी मुलगी मुलाखतीसाठी कशी नटून येते तसाच तो आला होता असं कंपनीचं म्हणणं होतं. हे कारण ऐकल्यावर त्यानं कंपनीला कोर्टात खेचलं. आपण गे नाही तरीही कंपनीनं आपल्याला गे ठरवलं तसेच आपल्या कामापेक्षा आणि अनुभवापेक्षा त्यांनी वैयक्तिक आयुष्याबद्दल कंपनी जास्त प्रश्न विचारत होती असाही आरोप त्याने केला. तेव्हा आपली बदनामी केली म्हणून त्यानं कंपनीविरोधात ५० हजार रशियन रुबल्स म्हणजेच जवळपास ५३ हजारांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. न्यायलयानं त्याला ३० हजार रुबल्स देण्याचे आदेश कंपनीला दिलेत. त्यामुळे केवळ एखाद्याच्या दिसण्यावरून त्याला चुकीचं समजणं कंपनीला खूपच भारी पडलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *