घाटकोपर दुर्घटना, सुनील शितप बाहेर पडल्यानंतर इमारत कोसळली

घाटकोपरमध्ये २५ जुलैला कोसळलेल्या साई सिद्धी अपार्टमेंट या इमारतीबाबत धक्कादायक माहिती झी मीडियाच्या हाती आली आहे. ही इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेला जबबादर असलेला सुनील शितप  इमारत दुर्घटनेच्या अवघ्या पाच मिनिटं आधी या इमारतीतून निघून गेला होता.

१० वाजून १९ मिनिटांनी शितप इथून निघून गेला आणि त्यानंतर पाचच मिनिटात ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. यासंदर्भातलं सीसीटीव्ही फूटेज झी मीडियाच्या हाती लागलंय. या दृश्यात सुनील शितप इमारतीतून बाहेर पडताना स्पष्ट दिसतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *