मित्रासाठी कायपण…मित्राच्या लग्नासाठी केली चोरी

मित्राच्या लग्नासाठी पैशाची गरज असल्याने मित्रांनी मिळून  दुकानात घरफोडी केल्याचा प्रकार उल्हासनगर मध्ये समोर आला आहे.

उल्हासनगर पंजाबी कॉलनी भागात दिलीप केशवानी यांचे ओम फर्निचर नावाचे दुकान आहे. सकाळी साडे दहावाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे केशवानी यांनी दुकान उघडले असता त्यांना दुकानातील दोन कॉप्युटर चोरीस गेल्याचे लक्षात आले.

त्यानंतर केशवानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करून पुढील  तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांनी काही दिवसांपूर्वी नोकरी सोडून गेलेल्या गणेश डे आणि अजय कुमार यांचा शोध घेतला आणि त्यांची उलट तपासणी केली. यावेळी दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.

अजय कुमार याचे एका मुलीसोबत प्रेम सबंध होते आणि त्यांना लग्न करायचे होते मात्र लग्नासाठी अजयकडे पैसे नव्हते त्यामुळे त्या दोघांनी मिळून दोघे  पूर्वी काम करत असलेल्या दुकानात चोरी केली. या प्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी तिघांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *