जिओमध्ये नोकरीची सुवर्ण संधी

रिलायंस जिओने 4G नेटवर्क क्षेत्रात देशात एक जशी क्रांती केली आहे. त्यानंतर आता जिओने नोकरीमध्ये देखील संधी आणली आहे. कंपनीने सेल्स, डिस्ट्रीब्यूशन विभागात १९०० जागांसाठी जाहिरात आणली आहे. कंपनीची वेबसाईट jio.com वर याबाबत माहिती देण्यात आली आहे.

कंपनीला सेल्स रिसर्च, प्लानिंग, डिमांड क्रिएशन, बजटिंग आणि सेल्स कॉर्डिनेशनसाठी एग्जीक्यूटिव हवे आहेत.

देशातील विविध भागामध्ये नोकरीसाठी ही संधी असणार आहे. ज्यामध्ये दिल्ली, कोलकाता, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.

जाहिरातीत पोस्टनुसार शिक्षणाची अट आहे. डिजिटल रिपेयर स्पेशलिस्टसाठी १२ वी आणि ITI किंवा डिप्लोमा हवे आहे. सेल्समध्ये सीनियर पोस्टसाठी ५ ते ७ वर्षाचा अनुभव आणि एमबीए डिग्री असणाऱ्या उमदेवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. कस्टम सेवांमध्ये देखील १२० पदांसाठी जागा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *