कळसावर उगवलेल्या १०० वर्षे जुन्या झाडाला पाणी घालण्याची ही पद्धत पाहिलीत का?

अनेकदा आपण इमारतीच्या बाजूला वडाची, पिंपळाची छोटी रोपटी रुजलेली पाहिली असतील. आपल्या रस्त्यावरच्या जुन्या इमारतीत हे दृश्य हमखास दिसतं. पक्षी वडाची, पिंपळाची फळं खातात. त्यांच्या विष्टेतून मग या बिया इमारतीच्या एखाद्या कोपऱ्यात रुजतात. इमारतीच्या पाईपलाईनमधून गळत असलेलं पाणी मिळतं आणि मग ही रोपटी तीन चार फूटांपर्यंत सहज वाढत जातात.

पण तुम्ही कधी इमारतीच्या छतावर वृक्ष वाढलेला पाहिला आहे का? नाही ना मग हा व्हिडिओ पाहाच. चीनमधल्या हुबै प्रातांत एक पॅगोडा आहे. जवळपास १४० फूटांपेक्षा उंच असलेल्या या पॅगोडाच्या कळसावर डेरेदार वृक्ष आहे. गेल्या १०० वर्षांपासून हा वृक्ष तिथे आहे. दहा फूट उंच असलेल्या या वृक्षाला दररोज क्रेनच्या मदतीनं पाणी दिलं जातं.  १५ व्या शतकात मिंग साम्राज्याच्या काळात हा पॅगोडा इथे बांधण्यात आला. हा डेरेदार वृक्ष कसा उगवला? याबद्दल कोणालाच काहीच माहिती नाही. पण दरदिवशी या वृक्षाला पाणी दिलं जात आणि त्याची काळजीही घेतली जाते. जर हा वृक्ष तोडला तर इमारतीला धोका पोहोचेल म्हणून हा वृक्ष  आतापर्यंत तोडला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *