क्रिकेटर जयंत यादवला पितृशोक

भारतीय संघातील युवा क्रिकेटर जयंत यादवचे वडील जयसिंह यांचे हृद्यविकाराच्या धक्क्याने निधन झाले. दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना किडनीचा त्रासही होता.

जयसिंह स्वत: एक क्रिकेटर होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ते खेळलेत. जयसिंह यांचे भाऊ योगेंद्र यादव यांनी निधनाची बातमी दिली.

गेल्या वर्षी जयंत यादवने भारतीय संघात पदार्पण केले. जयंतने ४ कसोटी आणि एका वनडेत भारताचे नेतृत्व केलेय. जयंतने कसोटीमध्ये नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतकही ठोकलेय. हा विक्रम करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *