संतप्त महिलांनी दारु अड्डा पेटवला

कोल्हापुरातील कवठेसारमध्ये महिलांचा रुद्रावतार पहायला मिळाला. कवठेसारमध्ये दानोळी रोडवर गेल्या अनेक दिवसांपासून हातभट्टी दारु अड्डा सुरु होता. संतप्त महिलांनी हा अड्डाच पेटवून दिलाय.

कवठेसारमधील या दारु अड्ड्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. पोलिसांकडे अनेकदा तक्रारी करुनही याकडे दुर्लक्ष केलं जात होतं. याठिकाणी येणा-या मद्यपींमुळे महिलांना परिसरात वावरणंही कठीण झालं होत.

शेवटी कवठेसारच्या महिलांचा उद्रेक झाला आणि त्यांनी शुक्रवारी हा दारु अड्डा पेटवून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *