अभिनेता मनोज गोयलच्या पत्नीची आत्महत्या

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता मनोज गोयलच्या पत्नीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. शनिवारी दुपारी ही घटना घडली.

सब चॅनेलवरील गोलमाल है भाई सब गोलमाल है, तु मेरे अगल बगल है या मालिकेत मनोज गोयलने काम केलेय.

गेल्या काही दिवसांपासून मनोजची पत्नी नैराश्यात होती. यातूनच तिने आत्महत्या केल्याचे समजतेय. दरम्यान, मनोजच्या घरातून बायकोची सुसाईड नोट मिळाली असून यात आत्महत्येला कोणासही जबाबदार धरु नये असं म्हटलंय.

जेव्हा ही घटना घडली तेव्हा मनोजची पत्नी एकटीच घरी होती. मुलगी ट्युशनला गेली होती आणि मनोज कामानिमित्त बाहेर गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *