पुण्यातील सिंहगड किल्ल्याची दरड कोसळली

पुण्यातल्या सिंहगड  किल्ल्याची दरड कोसळली आहे. पार्किंगच्या बाजुची दरड पडल्याने अनेक पर्यटक गडावर अडकले असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरड कोसळल्याची माहिती हवेली तहसीलदार कार्यालयाला पोलिसांकडून देण्यात आली होती.

दरड कोसळल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली आहे. रविवारचा दिवस असल्याने आज सिंहगडावर पर्यटकाची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *