तुमच्या व्हॉटसअपमध्ये येतोय एक नवीन फिचर

तुमच्या नेहमीच्याच वापराच्या झालेल्या व्हॉटसअपमध्ये एक नवीन फिचर अॅड होतंय. या नव्या सुविधेमुळे युझर्स व्हॉईस कॉल  दरम्यान व्हिडिओ कॉलमध्ये स्विच करू शकतील.

व्हॉटसअपमध्ये व्हिडिओ कॉल आणि व्हॉईस कॉलची सुविधा आहे. परंतु, सध्या यामध्ये एक कॉल दुसऱ्या कॉलमध्ये स्विच करण्याची सुविधा उपलब्ध नाही. हे नवीन फिचर अॅड झाल्यानंतर व्हॉईस कॉल दरम्यान व्हि़डिओ कॉलला डिस्कनेक्ट करण्याची गरज पडणार नाही.

सध्या बीटा व्हर्जनवर याची टेस्टिंग सुरू आहे. अॅन्ड्रॉईड बीटा व्हर्जन २.१७.२६३ वर गेल्या आठवड्यात हे नवीन फिचर जोडण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *