ठाण्यात अंगावर झाड कोसळून वकिलाचा मृत्यू

चेंबूरमध्ये नारळाचं झाड अंगावर कोसळून जखमी झालेल्या कांचन नाथ या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असतानाच ठाण्याच्या पाचपाखाडी भागातही अंगावर झाड कोसळून एका युवकाचा मृत्यू झालाय… किशोर पवार असं मृत व्यक्तीचं नाव आहे. किशोर हे पेशानं वकील होते.

शुक्रवारी सकाळी मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना त्यांच्या अंगावर झाड कोसळलं. यात ते जबर जखमी झाले. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र शनिवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.. विशेष म्हणजे चेंबूरप्रमाणे इथंही पालिकेच्या अधिका-यांचा निष्काळजीपणा निष्पाप नागरिकाच्या जीवावर बेतलाय.. कारण पवार अंगावर  कोसळलेलं झाड धोकादायक स्थितीत असल्याची तक्रार करण्यात आली होती मात्र अधिका-यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं..  शहरांत असे अनेक धोकादायक वृक्ष आजही मृत्यूचा सापळा बनलेत त्यामुळे या दुर्घटनांपासून धडा घेत पालिका आता तरी यावर कारवाई करणार का याकडे सा-यांचं लक्ष लागलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *