मालाडमध्ये थोडक्यात घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली!

घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती मालाडमध्ये होता होता वाचली.

मालाड पूर्वेतील दत्तानी रोड, कुरार विलेज येथील विजयद्वार इमारत सकाळी अचानक खचली. ही इमारत ४० वर्ष जुनी आहे. या इमारतीत एकूण १४ कुटुंब राहतात. इमारतीमध्ये सात निवासी घरं आणि सात गाळे आहेत… इमारत ही ग्राउंड अधिक तीन मजल्याची खाजगी इमारत आहे.

या इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल या सोसायटीनं २०१५ साली पालिकेला दिला होता. घटना घडल्यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी, अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षेच्या कारणास्तव इमारतीतील सर्व राहिवाशांना बाहेर काढण्यात आलं.

सध्या या इमारतीला सपोर्ट देण्याचे काम सुरु करण्यात आलंय. त्यांनतर पालिका कोणता निर्णय घेईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे अग्निशमन दलाचे अधिकारी रवी पावडे यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *