घाटकोपरमध्ये चार मजली इमारत कोसळली; ३० ते ४० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

घाटकोपरमधील दामोदर पार्क भागातील ‘साईदर्शन’ नावाची एक चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती कळताच अग्निशामकदलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.  इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ३० ते ४० जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. यातून ८ ते ९ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर एक रुग्णालय असून या रुग्णालयाच्या नुतनीकरणाचे काम सुरु असताना ही इमारत कोसळल्याचे सूत्रांकडून कळते. आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

४० वर्षांपूर्वीची ही जुनी इमारत असून या इमारतीला महापालिकेकडून नोटीस देण्यात आली होती की नाही याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.  घटनास्थळी अग्निशामन दलाची एक गाडी दाखल झाली असून महापालिकेनेही मदत पाठवली आहे. तसेच ८ रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या आहेत. सध्या युद्धपातळीवर या ठिकाणी मदत कार्य राबण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *