जीव वाचवण्यासाठी २०० मेंढ्यांनी दरीत उडी मारली

आपला जीव वाचवण्यासाठी २०० मेंढ्यांनी चक्क दरीत उडी मारली आणि आपला जीव गमावला. फ्रान्समधली ही घटना आहे. एका मेंढपाळाच्या मेंढ्या चरायला गेल्या होत्या. संध्याकाळी परतीची वेळ झाली तरी त्या परतल्या नाही हे पाहून मेंढपाळही अस्वस्थ झाला. आपल्या मेंढ्यांचं नक्की काय झालं हे त्यालाही कळेना. आपल्या इतक्या मेंढ्या कुठे गेल्या हे कळेचना. आपल्या या  कळपाचा शोध घ्यायचं त्याने ठरवलं. जेव्हा मेंढ्याचा शोध घेण्यासाठी सैरभैर होऊन तो टेकडीचा परिसर भटकू लागला तेव्हा त्याने जे पाहिलं ते पाहून त्याला धक्काच बसला. कारण त्याच्या २०० हून अधिक मेंढ्या त्याला दरीत मृतावस्थेत दिसल्या.

आता हे अचानक कसे काय झाले? इतक्या मेंढ्या एकदम कशा काय मरतील? असा प्रश्न तुमच्याप्रमाणेच त्यालाही पडला. मग काहीसा शोध घेतल्यावर त्याच्या लक्षात आले की या परिसरात अस्वल खूप आहेत. यातलं एक अस्वल कळपाच्या मागे लागलं तेव्हा जीव वाचवण्याच्या नादात या मेंढ्यांनी टेकडीवरून खाली दरीत उडी मारली. आणि ही खोली इतकी जास्त होती की सगळ्या मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. काही महिन्यांपूर्वी अशीच एक घटना घडली होती ज्यात अशाप्रकारे वरुन उड्या घेतल्याने ७० मेंढ्याचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *