महाड बाजारपेठेत सावित्रीचे पाणी घुसले, सतर्कतेचा इशारा

रायगड जिल्ह्यात महाड पोलादपूर भागात जोरदार पाऊस  सुरू आहे. महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री नदीतली पाणीपातळी कमालीची वाढलीय. पुराचं पाणी महाड शहरात घुसलेय.

महाडच्या मच्छी मार्केट, दस्तुरी नाका इथे पाणी शिरलं आहे. महाड ते नातेखिंड दरम्यानचा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. नगरपालिकेने भोंगा वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

रायगडमध्ये काल संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर पहाटेपासून कमी झाला असला तरी महाड पोलादपूर तालुक्यात अधून मधून जोरदार सरी कोसळतायत.  सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतही रात्रभर पावसाचा जोर कायम होता.  सिंधुदुर्गात संपूर्ण जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *