व-हाडींनो जरा जपून! यापुढे लग्नात फटाके फोडले तर कारवाई

लग्न म्हटले की,  कुटुंबिय, नातेवाईक आणि मित्रपरिवार यांचा उत्साह ओसांडून वाहत असतो. लग्नाच्या दिवशी तर, या सर्वांचा उत्साह टिपेला पोहोचलेला असता. हा दिवस सगळयांच्याच लक्षात राहील अशा पद्धतीने साजरा करण्याच्या नादात अनेकदा लग्नाच्या हॉलबाहेर फटाके फोडले जातात. डिजे तालावर ठेका धरला जातो. पण यापुढे व-हाडी मंडळींना हॉलवर  अशा प्रकारे सेलिब्रेशन करता येणार नाही.
कारण राष्ट्रीय हरीत लवादाने लग्नाचे हॉल आणि लॉन्सवर डीजे आणि फटाके फोडून ध्वनिप्रदूषण करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. पुण्यातील सुजल सहकारी गृहरचना संस्था सोसायटीने दाखल केलेल्या याचिकेवर राष्ट्रीय हरीत लवादाने हा निर्णय दिला. एनजीटीचे न्यायाधीश यू.डी.साळवी आणि डॉ. अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *