भारतीय क्रिकेट टीममधील वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या घरात चोरी झाली आहे. सोमवारी (17 जुलै ) संध्याकाळी नागपुरातील शंकरनगर परिसरातील राहत्या घरात चोरीचा प्रकार घडला. येथील चौथ्या मजल्यावर उमेश यादवचं घर आहे. घरात कुणीही नाही याची संधी साधून चोरांनी जवळपास 1 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे चोरीची घटना घडली त्यावेळी उमेश यादव नागपुरातच होता. पण यावेळी कुटुंबीयांसोबत पार्टीसाठी बाहेर गेला होता. घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे सर्वांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे याबाबत तक्रार नोंदवण्यात आली.
