नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय

राज्यभरातल्या महापालिकांचे नगरसेवक मालामाल होणार आहेत. नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेतल्या नगरसेवकांना महिन्याला 25 हजार रुपये इतकं मानधन मिळणार आहे.

तर ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, यांसह इतर अ वर्गातल्या महापालिका नगरसेवकांना महिन्याला आता 20 हजार रुपये मानधन मिळेल.

त्याचवेळी ब वर्गातल्या पालिकांच्या नगरसेवकांना 15 हजार, तर क आणि ड वर्गातील पालिका नगरसवेकांना दर महिना 10 हजार रुपये मानधन मिळेल. वाढलेली महागाई लक्षात घेता सरकारनं हा निर्णय घेतलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *