मुंबईकरांसाठी खूशखबर ! मोडक सागर धरण ओव्हरफ्लो

– तलाव परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे तलावाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.  मुंबईला पाणी पुरवठा करणा-या प्रमुख धरणांपैकी एक असलेला मोडक सागर धरण ओव्हरफ्लो झाला आहे. शनिवारी सकाळी 6.32 वाजता मोडक सागर धरण दुथडी भरून वाहू लागले आहे.  या तलावातून मुंबईला दररोज 455 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत. दरम्यान अन्य तलावांतही पाण्याची पातळी वाढत असल्याने  मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन लवकरच मिटणार आहे.
अपु-या पावसाने 2015 मध्ये मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्या काळात मुंबईकरांना वर्षभर पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. परंतु गेल्यावर्षी तलाव परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्याचे टेन्शन निवळले. मधल्या काळात मध्य वैतरणा जलवाहिनीनेही मुंबईचा जलसाठा वाढवला. त्यामुळे मुंबईला दररोज 3750 दशलश लीटर पाणीपुरवठा केला जात आहे.
या वर्षी पावसाने चांगला जोर धरला आहे. त्यामुळे प्रमुख तलावांपैकी  एक असलेला मोडक सागर धरण आज सकाळी ओव्हरफ्लो झाल्याने धरणाचे दोन गेट उघडण्यात आले आहेत. या तलावापाठोपाठ मुंबईतील विहार तलावही लवकरच भरून वाहण्याच्या मार्गावर आहे. मात्र मुंबईला वर्षभर चांगला पाणी पुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये 1 ऑक्टोबर रोजी 14 लाख दशलश लीटर जलसाठा असणे अवाश्यक आहे.
मुंबईला दररोज 3750 दशलश लीटर पाणीपुरवठा होतो. मुंबईत पाण्याची मागणी दररोज 4200 दशलश लीटर एवढी आहे. दररोज 25 ते 30 टक्के म्हणजे सुमारे नऊशे लीटर पाणी गळती व चोरीमध्ये वाया जात आहे.
तलावातील जलसाठा
मोडकसागर ९४,४९६ दशलक्ष लीटर
तानसा           १,०५,०२८ दशलक्ष लीटर
विहार ११,०७९ दशलक्ष लीटर
तुलसी ३,८५० दशलक्ष लीटर
अप्पर वैतरणा    ६४,४३१ दशलक्ष लीटर
भातसा         ३,२३,६१८ दशलक्ष लीटर
मध्य वैतरणा १,८१,४९७  दशलक्ष लीटर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *