मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागातील सहायक आयुक्त दिलीप शिंदे यांचा मंगळवारी स्वाइन फ्लूने बळी घेतला. ते ५५ वर्षांचे होते. दिलीप शिंदे हे वरळी येथील वाहतूक मुख्यालयात कार्यरत होते.
शिंदे यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याने ७ जुलै रोजी वांद्रे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी सायंकाळी त्यांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला.
बुधवारी सकाळी वांद्रे कार्टर रोड येथील पोलीस वसाहतीत त्यांचे पार्थिव आणल्यानंतर दुपारी दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
