मुंबईत स्वाईन फ्लूने पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

शहरात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूने डोके वर काढले आहे. स्वाईन फ्लूने एका पोलीस  अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.

मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप शिंदे स्वाईन फ्लूला बळी पडलेत. काल संध्याकाळी मुंबईतल्या होली फॅमिली रुग्णालयात त्यांचं मृत्यू झाला.

मूळचे सोलापूरचे शिंदे १९८७मध्ये उपनिरीक्षक म्हणून मुंबई पोलीसात रुजू झाले. त्यांनी याआधी सांताक्रुझ, माहीम आणि धारावीत विविध हुद्द्यांवर काम केलं होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *