मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तिघे गजाआड

मुंबईतील ट्रॉम्बे परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर भांडुपमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. वडिलांच्या मित्रानेच हा बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एक संशयित फरार आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

ट्रॉम्बे परिसरात राहणारी १५ वर्षीय मुलगी बुधवारी (दि.५ जुलै) आपल्या वडिलांच्या मित्रासोबत फिरायला गेली होती. त्यांनतर या मित्राने भांडुपमधील एका दुसऱ्या आरोपीच्या घरी मुलीला नेले. तिथे वडिलांच्या मित्राने आणि इतर तिघांनी लैंगिक अत्याचार केले. त्यांनतर दुसऱ्या दिवशी तिला दुपारी धमकावून घरी पाठवले.

पीडित मुलीने आपल्या वडिलांसोबत ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी या चारही जणांवर सामूहिक बलात्कार, अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये तिन्ही आरोपींना शुक्रवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. अटकेत असलेल्या तिघांना दि.१२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *