वय वर्षे ५० आणि उंची फक्त सव्वा दोन फूट

बसोरी लाल वय वर्षे ५०, पण त्यांना पहिल्यांदाच पाहणाऱ्यांचा मात्र अनेकवेळा गोंधळ उडतो. याचं कारण आहे त्यांची उंची. बसोरी यांची उंची आहे फक्त २९ इंच म्हणजे जवळपास सव्वा दोन फूट. त्यांना पाहिलं की समोरून पाच एक वर्षांचं लहान मुलं येतंय की काय वाटून नवख्यांचा पुरता गोंधळ उडतो. पण लोकांचा उडालेला हा संभ्रम पाहून बसोरी लाल यांना खूपच गंमत वाटते. कधी कधी छोटं मुलं समजून अनेकजण त्यांना उचलूनही घेतात, त्यांच्या गावाचे ते जणू सूपरस्टारच झालेत.

बसोरी लाल मुळचे मध्यप्रदेशचे. सध्या ते आपल्या भावाच्या कुटुंबीयांसोबत राहतात. पाच वर्षांचे असल्यापासून त्यांची शारिरिक वाढ खुंटत गेली. लवकरच ते इतर मुलांसारखे नाहित हे त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आले. पण बसोरींवर इलाज करण्याएवढे पैसे मात्र त्यांच्या कुटुंबियांकडे नव्हते. बसोरी यांची घरची परिस्थिती हलाखीची होते. कुटुंबाकडे दोन वेळच्या जेवणाचे पैसेही नव्हते, तिथे त्यांच्यावर उपचार तरी कुठून करणार. लहान वयात बसोरींना उपचार मिळालेच नाही त्यामुळे त्यांची शरीराची ठेवण तशीच राहिली.  आज अनेक लोक त्यांना पाहण्यासाठी येतात. या गावतले जणू ते सेलीब्रिटीच झालेत. कधी कधी लोक त्यांची मस्करीही करतात पण देवाने आपल्याला जसं बनवलंय त्याचा न्यूनगंड ते अजिबात बाळगत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *