यवतमाळमध्ये कार अपघातात २ ठार

यवतमाळमधील राष्ट्रीय महामार्ग ७ वर ट्रक आणि वॅगनआरमध्ये झालेल्या भीषण अपघातात २ ठार झालेत तर एकजण जखमी झालाय.

उत्तरप्रदेशातील रायबरेलीचे मिश्रा कुटुंबिय बंगलोरहून अदिलाबादमार्गे परत जात होते. यावेळी ट्रकला ओव्हरटेक करताना कार ट्रकला धडकली आणि हा अपघात झाला.

ही धडक इतकी भीषण होती की कारमधील दोघेजण जागीच ठार झाले तर एक व्यक्ती जखमी झालीये. जखमीवर सध्या यवतमाळच्या जिल्हा रुग्णालायत उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *