प्रेमप्रकरणातून विटभट्टीवर काम करणाऱ्या तरुणीवर गोळीबार

विट भट्टीवर काम करणाऱ्या तरुण मुलीवर गोळीबार  झालाय. पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय.

काजल लक्ष्मण शिंदे असं या जखमी मुलीचं नाव आहे. काजल विटभट्टीवर ती काम करत होती. यावेळी, एका अज्ञात तरुणानं तिच्यावर गोळीबार केला. खेड तालुक्यातील शिरोली इथं ही घटना घडलीय.

या घटनेत मुलीच्या छातीत गोळी घुसल्यानं ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर तात्काळ तिला राजगुरुनगर इथल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं तिच्यावर उपचार सुरू आहेत.

 प्रेमप्रकरणातून हा धक्कादायक प्रकार घडल्याचं सांगण्यात येतंय. गोळीबारानंतर फरार झालेल्या हल्लेखोराला खेड पोलिसांनी अटक केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *