युद्धाचा आदेश देणाऱ्यांनाच युद्धावर धाडा, सलमानच्या वक्तव्यावर वाद

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या एका वक्तव्यावर चांगलाच वाद  निर्माण होण्याची शक्यता आहे. सलमाननं युद्धासंबंधी केलेल्या वक्तव्यावर हा वाद सुरु झालाय.

सलमान खाननं आपल्या आगामी सिनेमा ट्युबलाईटच्या प्रमोशन दरम्यान हे वादग्रस्त वक्तव्य केलंय. जे लोक युद्धाचा आदेश देतात त्यांना बंदूक देऊन युद्धाच्या मैदानात धाडायला हवं… जे युद्धाची वकिली करतात त्यांनाच सीमेवर धाडायल हवं… त्यांनी बंदूक हातात धरली तर पाय कापायला लागतील, असं वक्तव्य सलमान खाननं केलंय.

युद्धामुळे दोन्ही उभयदेशांचं नुकसानंच होतं, असंही सलमाननं म्हटलंय. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान त्याच्यासोबत त्याचा छोटा भाऊ सोहेल खानदेखील होता. सोहेलनं सिनेमातही सलमानच्या छोट्या भावाची भूमिका निभावलीय.

सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘सुपर नाईट विथ ट्युबलाईट’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आलेल्या स्पेशल कार्यक्रमात सलमान, सोहेलशिवाय सुनील ग्रोवर, सुगंधा मिश्रा, अली असगक हे देखील दिसणार आहेत. एका स्पेशल परफॉर्मन्ससाठी सलमानची फेव्हरेट मौनी रॉयदेखील या कार्यक्रमात दिसेल.

हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर २३ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *