ठाण्यात चालत्या रिक्षात तरुणीचा विनयभंग

ठाण्याच्या तीन हात नाका येथून शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्या तरुणीचा  सहप्रवासी आणि रिक्षाचालकाने विनयंभग केल्याची घटना घडलीये. बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हे घडले.

प्रतिकार करणाऱ्या तरुणीने आरडाओरड करताच तिला या दोघांनी मारहाण केली. मात्र त्यानंतरही तरुणीसाठी मदतीसाठी ओरडत असताना घाबरलेल्या
सहप्रवाशाने तिला रिक्षातून निर्दयीपणे पोखरण रोडवरील एका कंपनीजवळ फेकून दिले.

याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *