व्होडाफोनची रमजान स्पेशल ऑफर, 5 रुपयात अनलिमिटेड डाटा

टेलिकॉम कंपनी व्होडाफोन इंडियाने रमजानच्या निमित्ताने खास ऑफरची घोषणा केली आहे. ‘अनलिमिटेड शेअरिंग, अनलिमिटेड केअरिंग’ या ऑफरसोबत व्होडाफोनने पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील स्थानिकांना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगसोबत फ्री डाटा मिळवण्याची संधी दिली आहे.
व्होडाफोनने मंगळवारी आपल्या या नव्या रमजान स्पेशल नव्या ऑफरची घोषणा केली आहे. यामध्ये 2G वापरकर्ते *444*5#  डायल करुन 5 रुपयात अनलिमिटेड डाटा ऑफर मिळवू शकतात. तर 3G वापरकर्ते *444*19# डायल करुन 19 रुपयात अनलिमिटेड डाटा ऑफरचा फायदा घेऊ शकतात. अनलिमिटेड डाटाशिवाय 2G वापरकर्ते 253 रुपयात अनलिमिटेड पॅकसोबत अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलचाही लाभ घेऊ शकतात.
युजर्स 245 रुपयात अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलसोबत 1GB डाटाही मिळवू शकतात. तसंच लोकल आणि एसटीडी कॉलसाठी फक्त 30 पैसे प्रती मिनिट मोजावे लागतील. 90 दिवसांसाठी ही ऑफर लागू असेल.
‘रमजानचा पवित्र महिना आमच्यासाठी खूप खास आहे. यासाठी आम्ही आमच्या युजर्सला लक्षात ठेवत हे पैसा वसूल पॅकेज आणलं आहे. नव्या डाटा आणि कॉलिंग पॅक्ससोबत युजर्स आपलं कुटुंब आणि मित्रांसोबत जोडले जातील. तसंच माफक दरात इंटरनेटचा फायदाही मिळेल. या पवित्र महिन्यात आपल्या भावनाही एकमेकांसोबत शेअर करु शकतील’, असं व्होडाफोन इंडियाचे पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड बिजनेस हेड दिलीप कुमार गंटा यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *