धुळ्यात निवासी डॉक्टरांना नातेवाईकांची मारहाण, डोळाच फोडला

शहरातील सर्वोपचार रुग्णालयात निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण  केल्याची घटना घडलीय. डॉ. रोहन मामुणकर असं या डॉक्टरांचं नाव असून ते निवासी अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. त्यांचा डोळा निकामी झालाय. याप्रकरणी 9 जाणांना अटक झाली.

साक्री मार्गावर अपघातात एक जण जखमी झाल्यानंतर त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी डॉ. मामुणकर यांनी या रुग्णाला न्यूरो सर्जनची आवश्यकता असल्याचे सांगितले. मात्र रुग्णालयात न्यूरोसर्जन नसल्याने संतप्त रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉ. मामुणकर यांच्याशी बाचाबाची करत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली असा आरोप होतोय.

या मारहाणीत डॉ. मामुणकर यांना आपला डोळा गमवावा लागल्याची माहिती समोर येतेय. मारहाणीचा हा सगळा प्रकार रुग्णालयातल्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालाय. या प्रकरणी 25 हून अधिक जणांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यापैकी नऊ जण अटक करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *