एसटी महामंडळावर ओढवली नामुष्की

डिसेंबर २0१६ पासून भाडेतत्वावरील शिवशाही एसी बस ताफ्यात येतील, अशी माहिती देणाऱ्या एसटी महामंडळावर आता नामुष्की ओढवली आहे. भाडेतत्वावर एसी बस देण्यासाठी निविदा प्रक्रीयेद्वारे पुढाकार घेणाऱ्या एका कंपनीने यातून

माघारच घेतल्याचे समोर आले आहे.

यातून एसटी महामंडळाने आता नव्या निविदेचा आधार घेतला असून, यात एक हजार एसी बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा अजब

निर्णय घेतला आहे. या आधी शिवशाही नावाने ५00 बसगाड्या येणार असल्याची घोषणा जानेवारी २0१६ मध्ये करण्यात आली होती.

परिवहनमंत्री व एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी पुढाकार घेत, जानेवारी २0१६च्या शेवटच्या आठवड्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंत्तीनिमित्त, परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाने मुंबई सेंट्रल येथे काही योजनांचे लोकार्पण केले. त्या वेळी शिवशाही एसी बस सगळ्यांसमोर सादर करण्यात आली. या सोहळ्यानंतर ४५ आसनी एसी बस आणि ३0 आसनी स्लीपर एसी बस अशा ५00 बस भाडेतत्त्वावर घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याचे सांगत, लवकरच शिवशाही ताफ्यात येईल, अशी माहिती वारंवार देण्यात आली. मात्र, वर्ष उलटत असतानाही भाडेतत्त्वावरील एसी बस मात्र, एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या नाहीत. महत्त्वाची बाब म्हणजे, राज्य परिवहन प्राधिकरणानेही शिवशाही बसचे दर निश्चित केले होते.

ही प्रक्रिया पार पाडली जात असतानाच, निविदा प्रक्रियेद्वारे एका कंपनीने पुढाकार घेतला.

मात्र, मोठ्या प्रमाणात बस भाडेतत्त्वावर देतानाच, त्यात एसटीकडून लादण्यात आलेल्या अटींमुळे कोणताही फायदा होत नसल्याचे कंपनीला दिसताच, त्याने माघार घेतली. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत शिवशाही बस ताफ्यात येतील, अशी माहिती देणाऱ्या एसटी महामंडळावर मोठी नामुष्की ओढावली. यातून बाहेर पडण्याऐवजी महामंडळाने नवीन निविदा काढत, १ हजार एसी बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. बसची संख्या वाढवून राज्यभर त्याचा विस्तार करायचा, हा त्यामागील उद्देश असल्याचे एसटीतील सूत्रांकडून सांगण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *