आंतरराष्ट्रीय सीमारेषा आणि नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करुन बीएसएफ चौक्यांवर जोरदार हल्ला चढवला. पाकिस्तानच्या या नापाक गोळीबाराला बीएसएफनेही सडतोड प्रत्युत्तर दिले. बीएसएफने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत १५ पाकिस्तानी रेंजर्स ठार झाल्याची माहिती बीएसएफने दिली आहे.
पाकिस्तानने नौशेरा, सुंदरबनी आणि पल्लनवाला सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात तोफाचा भडीमार करुन गोळीबार केला. गेल्या 12 तासांमध्ये पाकिस्तानकडून सहा वेळा शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात आलं आहे. भारतीय लष्करानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं असून बीएसएफकडून पाकिस्तानच्या शक्करगढ भागात करण्यात आलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानच खूप नुकसान झालं आहे.
पाकिस्तानचे 15 जवान ठार झाले असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक अरुण कुमार यांनी दिली आहे. तसंच पाकिस्तानी रेंजर्सचे 2 ते 3 तळ उद्ध्वस्त केल्याचीही माहिती मिळाली आहे.