गेले तीन दिवस घसरल्यानंतर सेन्सेक्स सोमवारी २१ अंकांनी वधारून २८०८२.३४ वर बंद झाला. धातू, कंझ्युमर डय़ुरेबल, माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांना बाजारात चांगली मागणी होती.
ऑगस्टमधील औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स वधारला. तसेच अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीच्या दुस-या डिबेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन जिंकल्या. त्याचा मोठा परिणाम झाला आहे.
दोन दिवसांची रजा, औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी, ग्राहक महागाई निर्देशांक व घाऊक महागाई निर्देशांकाची जाहीर होणारी आकडेवारी पाहता बाजाराचा सोमवारचा मूड सावधगिरीचा होता. पुढील आठवडयापासून जाहीर होणा-या कंपन्यांच्या दुस-या सहामाहीच्या निकालाकडे बाजाराचे लक्ष लागले आहे, असे जिओजित परिबाज फायनान्शियल सव्र्हिसेस लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.
शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी २८१४४.२८ अंकांवर उघडला. दिवसभरात तो २८२१६ पर्यंत वर गेला. दिवसअखेर तो २१.२० अंकांनी वधारून २८०८२.३४ वर बंद झाला. तर निफ्टी ११.२० अंकांनी वधारून ८७०८.८० वर बंद झाला.