दीपा कर्माकरने बीएमडब्ल्यू नाकारली

रिओ ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या जिम्नॅस्टिक्स दीपा कर्माकर हिला हैद्रबाद बॅडमिंटन असोसिएशनतर्फे बी. एम. डब्लू कार भेट देण्यात आली होती. मात्र, आता ही कार परत करण्याचा निर्णय दीपाने घेतला आहे. हैद्राबाद येथे नुकत्याच एका कार्यक्रमात सचिन तेंडूलकरच्या हस्ते ही कार तिला भेट देण्यात आली होती.
 दीपा कर्माकर राहत असलेल्या आगरतळा भागातील अरूंद आणि नादुरूस्त रत्यांवर या कारला मोठा मेंटन्स आहे. तसेच जर्मनीमध्ये होणाऱ्या चॅम्पियन कप स्पर्धेसाठी दीपा काही दिवसात रवाना होणार आहे. स्पर्धांची तयारी आणि दौरे यामुळे या कामाकडे लक्ष देणे दीपा अशक्य आहे. यामुळे तिने कार परत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.
 या विषयावर दीपा प्रत्यक्ष कोणतेही भाष्य केले नाही. तर तिचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांनी याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, ‘दीपाने हा स्वतः निर्णय घेतला नाही. तिने घरचे सदस्य आणि माझ्याशी याबाबत चर्चा केली होती. यानंतर हा निर्णय घेतला आहे. याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे अगरतळा येथे बी एम डब्लू कारचे सर्व्हीस सेंटर नाही, आणि दुसरे म्हणजे तेथील रस्ते बी एम डब्ल्यू सारख्या कारला चालविण्यासाठी योग्य नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *