पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर गेल्या ३२ महिन्यात एकही रजा घेतलेली नाही. पीटीआयने या संदर्भात वृत्त दिले आहे. पंतप्रधान कार्यालयाने माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली आहे. पण यापूर्वीच्या पंतप्रधानांच्या रजेसंदर्भातील माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीत येत नाही असे या कार्यालयाने म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून ३२ वा महिना आहे. पण या पूर्ण कालावधित त्यांनी एकही दिवस रजा किंवा सुटी घेतलेली नाही.
एका माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला पंतप्रधान कार्यालयाने हे उत्तर दिले आहे. त्यानुसार पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. अर्थात तांत्रिक दृष्ट्या पंतप्रधान कधीही रजेवर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे पंतप्रधानांना ऑल टाईम ड्युटीवर रहावे लागते, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
पंतप्रधान आणि मंत्र्यांना रजांची सुविधा नाही, अशी माहिती निवृत्त कॅबिनेट सचिव नरेश चंद्रा यांनी दिली आहे. अर्थात यापूर्वी तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८६ ला सुटी घेवून राजस्थान येथक्षल रणथंबोर नॅशनल पार्कला भेट दिली होती. तसेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी डिसेंबरमध्ये रजा घेत असत.