धुळ्यात अतिवृष्टी, साक्री तालुक्यात दोन पाझर तलाव फुटले

जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. या पावसाचा साक्री तालुक्याला सर्वाधिक फटका बसलाय. मुसळधार पावसाने साक्री तालुक्यातील 500 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय. कापूस, बाजरी,भुईमूग,मका,कांदा,यांसह फळबागांचं देखील नुकसान झालं आहे.

पावसाचा जनावरांनाही फटका बसला. 163 जणावरं दगावल्याची नोंद झाली आहे . तर 72 घरांची पडझड झाली आहे.  पाऊस अजूनही सुरूच आहे. पूरस्थिती असल्यामुळे पांझरा, तापी नदी काठच्या गावांना सर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

साक्री तालुक्यात दोन ठिकाणचे पाझर तलाव फुटले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. धुळे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 54 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पावसाने नुकसान झालेल्या ठिकाणचे पंचनामे चालू असल्याचं तहसिल कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. संपूर्ण जिल्ह्यात मिळून पावसाने 842.95 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *