पठाणकोटजवळील रावी नदीत बीएसएफच्या जवानांना मंगळवारी सकाळी एक पाकिस्तानी बोट आढळून आली. जवानांनी ही बोट ताब्यात घेतली असून पुढील चौकशी सुरू आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
पंजाबमधील पठाणकोट सेक्टरजवळ बीएसएफच्या जवानांना मंगळवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास रावी नदीत एक संशयास्पद बोट आढळून आली. या बोटीची माहिती मिळताच जवानांची स्पीड बोट घटनास्थळी दाखल झाली. ही बोट पाकिस्तानी असल्याचे पुरावे सापडले.
ही बोट ताब्यात घेतली असून तिची चौकशी केली असता ही बोट रिकामी होती. तरिदेखील तात्काळ हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.’ अशी माहिती बीएसएफच्या आधिका-यांनी दिली.