अभिनेत्री राधिका आपटे हिने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी असू नये असे मत व्यक्त केले आहे. एका स्विस कंपनीच्या घड्याळांच्या कंपनीच्या स्टोअरचे उद्घाटन तिच्या हस्ते होते. यावेळी तीला या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. ती म्हणाली, ‘जर स्विसमधील कंपनी भारतात येऊन तीचे स्टोअर सुरू करू शकत असेल तर मला वाटते पाकिस्तानी कलाकारांनी येथे आले पाहिजे आणि फिल्म्स केल्या पाहिजेत.’ सांस्कृतिक अदान प्रदान सुरू राहिले पाहिजे, असे ती म्हणाली आहे.
राधिकाने दहशतवादाचा निषेध करत भारतीय सैनिकांना पूर्ण पाठिंबा असल्याचेही सांगितले.
उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर इंडियन मोशन पिक्चर आट्रिस्ट असोसिएशनने पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम देऊ नये असा ठराव केला आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम करू नये अशी धमकी दिली आहे.
यानंतर सलमान खान, करण जोहर, ओम पुरी, अनुराग कश्यप अशांनी पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा दिला तर नाना पाटेकर, नवाजुद्दीन सिद्दीकी, रणदीप हुडा, सोनाली बेंद्रे अशा कालाकारांनी बंदीचे समर्थन केले आहे.