तालिबानने येथील मिनीबसवर केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात १४ नेपाळी सुरक्षा सैनिक ठार झाले आहेत, असे सरकारी अधिका-यांनी सांगितले. अफगाणिस्तानचे गृहमंत्री सादिक सिद्धिकी म्हणाले की, परकीय कंपनीच्या सुरक्षा सैनिकांना नेणा-या मिनीबसला आत्मघातकी दहशतवाद्यांनी टार्गेट केले.
या हल्ल्यात मरण पावलेले १४ जण नेपाळचे नागरिक असून ते एका कंपनीसाठी सुरक्षा सैनिक म्हणून काम करत होते. जखमींना तातडीने काबूल येथील रुग्णालयात नेण्यात आले.
तालिबानचे प्रवक्ते झबीउल्लाह मुजाहिदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी सरकारी कर्मचारी व अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांवर हल्ले वाढवले आहेत.