पुण्यात शुक्रवारी पुन्हा एकदा गँगवॉरचा भडका उडाल्याचा पाहिला मिळतोय. काही दिवसांपूर्वी घायवळ गँगने निलेश घायवळची तक्रार केलेल्या व्यक्तीची हत्या केली होती. आता वनराज आंदेकर प्रकरणातील साक्षीदाराची हत्या करण्यात आल्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी या साक्षीदारावर अज्ञातांनी बेछूट गोळीबार केला. गोळीबाराच्या थराराने परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. धक्कादायक म्हणजे ही घटना घोरपडे पेठ परिसरातील पोलीस चौकीच्या अगदी समोर घडली.
त्या तरूणाचे नाव ख्वाजा उद्दीन नाजीर शेख उर्फ नूर शेख असून त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आला. या घटनेत नूर गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान पोलिसांना कासेवाडी परिसरातील कुख्यात परदेशी गँगशी संबंधित गुंडांनी हा हल्ला केल्याचा संशय आहे. महत्त्वाचे म्हणजे नूर शेख हा राज्यभरात गाजलेल्या वनराज आंदेकर मर्डर केस मधील महत्त्वाचा आयव्हिटनेस म्हणजेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. पण पोलिसांनी यावर अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे.
