पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एकीकडे टोळीयुद्धाच्या घटना घडत असताना घरगुती हिंसाचाराच्या घटनाही वाढताना दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार पुण्यातील कोंढवा भागातून समोर आला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा क्रूरपणे छळ केला आहे. माथेफिरू पतीने पत्नीला हिटरने चटके देऊन मारहाण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी 40 वर्षीय नराधम पतीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेने याप्रकरणी कोंढवा पोलिसांत तक्रार दिली होती.
आरोपी पतीला अटक
पत्नीला मोबाईल घेतलेले पाहिलं अन्…
पीडित महिलेला चार मुले असून ती पतीसोबत राहत होती. पत्नीच्या हातात मुलीचा मोबाईल पाहून पतीने ‘तू कोणाबरोबर बोलत तर नाहीत ना’ असे विचारले. यावरुन पतीला राग अनावर झाला होता. त्यानंतर माथेफिरू पतीने पत्नीला ओढत बेडरुमध्ये नेले आणि दरवाजा बंद केला. यानंतर पत्नीचे हातपाय ओढणीने बांधून तिच्यावर अत्याचार सुरु केले. यावेळी पतीने पाणी गरम करण्याचे हिटर गरम केले आणि पत्नीच्या गुप्तांगावर चटके दिले. त्यानंतर पतीने पीडित महिलेवर शारिरीक अत्याचार देखील केले.
खलबत्याने केली जबर मारहाण
या सर्व अत्याचारानंतर पती इथेच थांबला नाही. तुला खूप माज आला आहे, तुझा माज उतरवितो, म्हणत पतीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि पीडित महिलेच्या डोक्यात, डोक्यात, हाता पायावर खलबत्याने जबर मारहाण केली. महिलीचा आरडाओरडा ऐकून बाहेर असलेली देखील मोठमोठ्याने रडू लागली. तेव्हा आरोपी पतीने बेडरुमचा दरवाजा उघडला. त्यानंतर आरोपीने मुलींसमोरच शिवीगाळ करत अश्लिल भाषेत धमकी देखील दिली. या सर्व प्रकारानंतर जखमी झालेल्या महिलेला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
