11 वर्षांपासून दुखत होतं पोट, रोजचं दुखणं समजून महिला करत होती दुर्लक्ष; MRI केला असता धक्काच बसला

रोजच्या व्यग्र आयुष्यात आपण अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. एखादं दुखणं असेल तर आपण तात्पुरता इलाज करतो. पण नंतर ही दुखणी पुढे जाऊन मोठी होतात आणि आपल्याच जीवाला धोके निर्माण करतात. नुकतंच असं एक प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेने तब्बल 11 वर्षं आपल्या पोटदुखीकडे दुर्लक्ष केलं आणि नंतर जेव्हा तिने MRI केलं तेव्हा डॉक्टरांनाही धक्का बसला. पोट दुखू लागल्यानंतर महिला नेहमी पेनकिलर्स घ्यायची. पण जेव्हा हे दुखणं प्रमाणाबाहेर जाऊ लागलं तेव्हा ती रुग्णालयात दाखल झाली. यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं.

हे प्रकरण कोलंबियामधील आहे. येथे 39 वर्षीय मारिया एडरलिंडो फोरियो नावाच्या महिलेच्या पोटातून सुई आणि घादा निघाला आहे. गेल्या 11 वर्षांपासून तिच्या पोटात असह्य वेदना होत होत्या. नुकतंच तिने तपासणी केली असता पोटात सुई आणि धागा अडकला असल्याने पोटात वेदना होत असल्याचं समोर आलं. डॉक्टरांनी ऑपरेशन करत सुई, धागा बाहेर काढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *