राज्यात लम्पी आजाराने (Lumpy skin disease) राज्य सरकार आणि शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. अनेक जनावरांना लम्पी रोगाने हैराण केले आहे. जनावरे दगावत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. यावर उपाय काय करायचा, हा शेतकऱ्यापुढे प्रश्न होता आहे. आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात 100 टक्के पशूधनाचं लसीकरण होणार आहे.
लम्पीने राज्याची काळजी वाढवली असताना सरकारने ही मोठी घोषणा केली आहे. राज्यात 100 टक्के पशूधनाचं लसीकरण होणार आहे. 5 किलोमीटर परिघाची मर्यादा सरकारने हटवली आहे. लसीकरण आणि औषधपाण्याचा खर्च शेतकऱ्याला करावा लागणार नाही. शासकीय पशू वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी उपाययोजना राबवण्यात सहभागी झाले आहेत. त्यामुळे जनावरांच्या वाढत्या आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश येईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
लम्पी रोगनियंत्रणासाठी टास्कफोर्स स्थापन करण्यात आला आ हे. जनावरांना वाचवण्यासाठी आता लसीकरणावर भर दिला जात आहे. राज्य शासनाने पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कृती गटाची स्थापना केला आहे. त्यात पशुचिकित्सा, पशुवैद्यकीय महाविद्यालय, सुक्ष्मजीवशास्त्र, आदी तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. 14 सप्टेंबपर्यंत राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे.
