धक्कादायक 26 वर्षीय शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू

 मालाड पश्चिमेला लिफ्टमध्ये अडकून शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. मालाडच्या सेंट मेरी शाळेत हा दुर्दैवी अपघात घडला. शिक्षिका तळमजल्यावरून सहाव्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टमध्ये आल्या. त्यानंतर लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि लिफ्टमध्ये शिक्षिका अडकल्या. या अपघातात 26 वर्षीय शिक्षिका गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल केलं असता त्यांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *